भूमिपुत्र आ.राम शिंदे यांच्या विजयासाठी अशोक देवमुंडे यांचे रुई येथील जागृत देवस्थान म्हसोबा चरणी साकडे 

0
161
Google search engine

 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ संघ सध्या हायटेक असून या निवडणुकीत भूमिपुत्र म्हणून आमदार राम शिंदे यांच्या विजयासाठी युवक वेगवेगळे नवस करताना पहायला मिळत आहे. राम शिंदे यांच्या विजयासाठी झिंजेवाडी येथील युवक कार्यकर्ते व पुणे येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे अशोक देवमुंडे यांनी तब्बल १२० किलोमीटर पायी चालत जाऊन दर्शन घेण्याचा नवस केला आहे. कार्यकर्त्याला नेहमी चेतना देणारे नेता म्हणून आमदार प्रा .राम शिंदे यांची ओळख ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात. त्यांच्या विजयासाठी मतदार संघातील सर्व भूमिपुत्र व नेते एकवटले आहेत. या निवडणुकीत जनतेचा कौल आ.राम शिंदे यांच्या बाजूने झुकत आहे. आमदार राम शिंदे यांच्या विजयासाठी अशोक देवमुंडे यांनी महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील रुई येथील जागृत देवस्थान रुईच्या म्हसोबाला साकडे घातले आहे. की, म्हसोबाच्या व जनतेच्या मतदान रुपी आशीर्वादाने आमदार शिंदे यांनी विधानसभेत मोठा विजय संपादन करून नामदार व्हावेत.त्यासाठी आपण झिंजेवाडी ता. कर्जत येथून टेंभुर्णी मार्गे रुई असा तब्बल १२० किलोमीटरचा प्रवास पायी चालून दर्शन घेणार आहोत. रुई येथील म्हसोबाची नवसाला पावणारे दैवत म्हणून ख्याती आहे. म्हसोबाच्या चरणी बोललेला नवस कधी वाया जात नाही. म्हसोबारायाला घातलेले माझे साकडे नक्की पूर्ण होईल आणि आमदार राम शिंदे मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास अशोक देवमुंडेंनी व्यक्त केला आहे .