आ.रोहीत दादा पवार यांचा विजय निश्चित : दत्तात्रय ढोबे पाटील आ.रोहित दादा पवार यांना टाकळी खंडेश्वरी मधून भरघोस मतदान होणार : दत्तात्रय ढोबे पाटील 

Google search engine

 

 

टाकळी खंडेश्वरी सह परिसरातील सर्वच गावांतून कर्जत जामखेड मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांना मोठे लीड देणार असल्याची दत्तात्रय ढोबे पाटील यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले , कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या विकास दूरदृष्टी त्यांना भावत असून आ.रोहित दादा गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास ह्या एकाच मुद्यावर होणार आहे . आ रोहीत दादांनी गावातील गरीब जनतेसाठी डोल चालू करून देवून त्यांचा जीवन जगण्याचा मार्ग सुखकर केला आहे.

कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.

अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.जलसंधारणाच्या कामांमध्ये ओढा , नदी खोलीकरण , रुंदीकरण , डीपी कट, तलावातील गाळ काढणे , तलावांचे एकत्रीकरण , डीप सीसीटी आदी कामे केली.जलसंधारण कामाच्या ५ वर्षात नव्याने पाणीसाठा ३५२ कोटी लिटर क्षमता निर्माण झाली .विहिरींच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३१८ कोटी रक्कम जमा झाली .कर्जत जामखेड तालुक्यात खरीप हंगाम २०२३ साठी १८१ कोटी रुपये पीक विमा जमा झाला. प्रकल्पग्रस्तांना कुकडीच्या भुसंपादनाचा १७४.२२ कोटी मोबदला मिळाला.कर्जत जामखेडच्या सक्षम वीज पुरवठ्यासाठी १२० कोटी निधी मंजूर केला .तसेच २०१९ पूर्वीची रखडलेली पीक विम्याची ७१.४८ कोटी रक्कम मिळवून दिली .गायगोठा अनुदान २०.९९ कोटी , शेळीपालन शेड १.९२ कोटी , लंपी रोगाच्या लसीकरणासाठी स्वखर्चातून १.५० लाख डोस उपलब्ध करून दिले .तसेच ५ वर्षात कुकडी कालव्याखालील सिंचन क्षेत्रात ११ हजारावरून २२ हजार हेक्टर पर्यंत वाढ झाली.मनरेगाच्या माध्यमातून ७९५५ विहिरी , जलसंधारनाच्या माध्यमातून नव्याने सिंचनाखाली ५०१७ हेक्टर क्षेत्र आले.४०० शेळीपालन शेड , ५२ किमी कालवा अस्तरीकरण , तुर,कांदा , कापूस आदी पिकांसाठी १४ हमीभाव केंद्र ,कोल्हापुरी पद्धतीच्या बांधायचे लातूर टाईप बॅरेज मध्ये रुपांतरला मंजुरी , वखार महामंडळाच्या २ गोदामांची उभारणी आदी मोठी विकासकामे केल्याने आ.रोहीत दादांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली