
कर्जत जामखेड मतदारसंघासाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे करण भाऊ चव्हाण यांनी सांगितले .
कर्जत जामखेड तालुक्यातील विकासात्मक बाबी या येथील जनतेच्या जीवनाशी निगडित असायला पाहिजे त्या म्हणजे शेती , पाणी , वीज , रोजगार , शिक्षण , आरोग्य सुविधा,क्रीडा संकुल , दळणवळण, पर्यटन विकास , शेतमाल प्रक्रिया ,स्वतंत्र वीज केंद्र नवीन बसेस.मतदार संघाचा शास्वत विकास होण्यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया चे करण भाऊ चव्हान यांनी मतदार संघासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.तालुक्याचा विकास करण्यासाठी व त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी करण भाऊ चव्हाण यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी जनतेसाठी कुकडी आवर्तन , शेती , वीज , रोजगार , शिक्षण , आरोग्य सुविधा,क्रीडा संकुल , दळणवळण, पर्यटन विकास , युवकांसाठी रोजगार निर्मिती व इतर सर्वच प्रश्नांसाठी ही ब्ल्यू प्रिंट असून सर्वसामान्य जनतेने करण भाऊ चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







