आ.रोहित दादा पवार ५० हजार पेक्षा जास्त मतांनी पुन्हा विजयी होवून आमदार होतील:- सचिन कापसे

Google search engine

 

आ.रोहित दादा पवार हे ५० हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी होवून पुन्हा आमदार होतील अशी खात्री सचिन कापसे यांनी बोलताना व्यक्त केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले , आ .रोहित दादा पवार यांनी २०१९ ला मतदार संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यात आपल्या कामांची चुणूक दाखवून दिली .ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती इमारत , बचत गट,आरोग्य शिबिरे , नेत्रशिबिरे , जल संधारण ,पाणीपुरवठा , नागरी सुविधा , सायकलींचे वाटप शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम , सॅनीटायजर वाटप , रायटिंग पॅड वाटप , मास्क वाटप दळण वळण संबंधी राष्ट्रीय महामार्ग , पाणंद योजना , पानी, वीज, आरोग्य , मोफत पाणी वाटप ,सिंचन आदी विकासकामांची पंचसूत्री राबवत विकासकामे झफाट्याने केली .कर्जत जामखेड मधील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची देण म्हणून लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघामध्ये ५० हजार पेक्षा जास्त मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया सचिन कापसे यांनी यावेळी व्यक्त केली . त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला.

यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाला कुटुंब मानले असून आमदार झाल्यानंतर रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुका विकासाच्या बाबतीत नंबर एक बनवला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. येणारे ३२ दिवस हे महत्वाचे असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. तत्कालीन मंत्र्यांनी कोणतीही विकासकामे न करता फक्त मतापूरता कर्जत जामखेड मधील जनतेचा फायदा घेतला.कोणी कितीही गप्पा मारल्या तरीही किंवा विरोधात कुणीही असले तरी विकास कामांच्या बळावर आमदार रोहित दादाच विजयी होणार आहेत. माजी मंत्र्यांनी रोहित दादांनी मंजूर केलेली कामे अडवण्याचे काम केले.त्यामुळे मतदार संघातील जनता याचे चोख उत्तर येणाऱ्या निवडणुकीत देईल. आज संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडचे विकासकामांमुळे नाव चर्चेत आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार व महाराष्ट्राचे युवा नेते रोहित दादा पवार यांचा संघर्ष सर्वांनी पहिला आहे.त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान घराघरात पोहोचवण्याचे काम मी व माझ्या सोबत असलेल्या युवांनी आजपर्यंत केले आहे. आ.रोहित दादा पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे. युवकांना आ .रोहीतदादांबद्दल प्रंचड विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.