
आ.रोहित दादा पवार यांनी धालवडी कोट्यवधी रुपयांचा विक्रमी निधी दिल्यामुळे आ.रोहितदादांचे आभार व्यक्त करत कर्जत जामखेड मतदार संघात धालवडी गावातून आ.रोहित दादा पवार यांना सर्वाधिक मते मिळून देणार असल्याची प्रतिक्रिया धालवडीचे मा.सरपंच दत्ता चौधरी यांनी व्यक्त केला.
दिलसे दादा , फिरसे दादा असे म्हणत त्यांनी यावेळी आमदार रोहित दादा यांच्यासाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले , धालवडी गावासाठी आ .रोहित दादा पवार विकासकामांची त्रिसूत्री राबवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , धालवडी येथे शाळेसाठी कंपाऊंड, ब्लॉक , तलाठी कार्यालय, स्मशान भूमी , गावठाण अंतर्गत क्राँकिटरस्ता , , वाडी वस्त्यांसाठी पाणंद रस्ते , टँकरने मोफत पाणी पुरवठा , जलजिवन मिशन अंतर्गत गावामध्ये पेय जल योजना , महिला बचत गट आदी विकासकामे झफाट्याने केली .सर्वसामान्य जनतेबरोबर आ.रोहित दादा पवार यांची नाळ घट्ट जोडली गेली असल्याने व कर्जत जामखेड मधील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची देण व स्व खर्चातून त्यांनी उभारलेली मोठी कामे यामुळे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघामध्ये प्रचंड मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया मा.सरपंच चौधरी यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी वार्तालाप केला.
यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाला कुटुंब मानले असून जनता जनार्दन , मायमाऊल्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे . आमदार झाल्यानंतर आ.रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुका कृषी , आरोग्य , रस्ते आदी विकासकामे करून विकासाच्या बाबतीत नंबर एक बनवला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. येणारे ३० दिवस हे महत्वाचे असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आज संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडचे विकासकामांमुळे नाव चर्चेत आहे. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी विधानसभा २०२४ ला निवडून येतील यात कोणतीही शंका नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आ.रोहित पवार हे निवडून आल्यानंतर मंत्री बनून कर्जत जामखेड मतदार संघ राज्यात एक नंबर तयार बनवतील. आ.रोहित दादा पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.
गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले . या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. युवकांना आ .रोहीत दादा पवार यांच्याविषयी तालुक्यातील जनतेला प्रंचड आत्मविश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.







