
गुरवपिंपरी येथे तालुक्यातील काही सुपारीबाज नेत्यांनी ग्रामस्थांच्या आक्रमकपणा पुढे काढता पाय घेतला
गुरव पिंपरी येथे सुपारीबाज नेते यांनी ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या विरोधात, त्यांनी केलेल्या विकास कामांच्या विरोधात कीव येईल अशी बडबड चालू केली.त्यांची ही विनाकारण,ज्या गोष्टी हे सुपारीबाज नेते कधीच करू शकत नाही असे कधीच न सुटणारे प्रश्न घेऊन ग्रामस्थांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न चालू केला.हा सर्व प्रकार गावातील युवक व ग्रामस्थ शांतपणे ऐकत होते आणि ऐकून घेतल्यानंतर युवक कार्यकर्ते व ग्रामस्थ लखन टकले,मारुती सूर्यवंशी,सागर गंगावणे,शेषराव टकले, अशोक टकले,लालासो पवार व ग्रामस्थ यांनी सुपारीबाज नेत्यांना खालील प्रमाणे प्रति प्रश्न विचरायला चालु केले :-
१) आपण गुरव पिंपरी मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून सर्वसामान्य जनतेची सोसायटीची प्रकरणे का हाणून पाडली.
२) आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना गावातील गोरगरिबांचा घरकुलांचा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सुद्धा गोरगरीब जनतेची घरकुलांची कामे यादी देऊन सुद्धा का मार्गी लावली नाहीत
३) पंधरा दिवस झाल्यानंतर तुमच्यातला एक तरी माणूस सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्येक गावात फिरू शकतो का.
४) ज्या वेळेस सर्वसामान्य जनता कोरोना सारख्या महामारीने,पाणी टंचाई ने व इतर अडचणीमध्ये असताना तुम्ही कुठे होते .
५) गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती येण्या जाण्या साठी रस्ते,वीज व इतर गोष्टी नव्हत्या त्या वेळी तुम्ही का धावुन नाही आले.
हा सर्व ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून सुपारीबाज नेत्यांची अक्षरशा: तारांबळ उडाली.चिडलेल्या ग्रामस्थांना रोखायचे कसे म्हणून नात्यागोत्याचा विषय पुढे करण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या कामकाजाच्या पद्धतीने, त्यांच्या विचारसरणीने प्रेरित झालेल्या युवकांनी व ग्रामस्थांनी त्यांना कोणत्याही प्रकारचा थारा न देता त्यांची अक्षरशा: सर्वांच्या समोर कानउघडनी केली आणि आता आपले पितळ उघडे पडलेले आहे हे पाहून अक्षरशः सुपारीबाज नेत्यांनी आपला गाशा गुंडाळून तेथून निघून जाणे पसंत केले.
आपण ज्या व्यक्तीच्या विरोधात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करून सर्वांच्या समोर येण्याचा जो केविलवाना प्रयत्न चालू आहे अशा या प्रकारे विरोधातून तरी कर्तुत्ववान , कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार हे जनतेच्या मनामध्ये कशा पद्धतीने बसलेले आहेत याचा तरी ठराविक व्यक्तींनी विचार करावा , अशी खोचक टीका सागर गंगावणे यांनी केली आहे .







