शिवाजी कारंडे यांची भाजपा ओबीसी मोर्चा सेल कर्जत तालुका उपाध्यक्षपदी निवड

Google search engine

 

आ. प्रा.राम शिंदे साहेब यांचे विश्वासू , कट्टर समर्थक मानले जाणारे शिवाजी कारंडे यांची भाजपा ओबीसी मोर्चा कर्जत तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शिवाजी कारंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी बोलताना शिवाजी कारंडे म्हणाले , ओबीसी सेल कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी संधी दिल्याबद्दल आ . प्रा.राम शिंदे साहेब , ओबीसी सेल अध्यक्ष

अजित अनारसे आदींचे आभार व्यक्त करत आ . प्रा. राम शिंदे साहेबांनी दिलेल्या संधीचे मी सोने करणार असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून पक्षहीत जपत तालुक्यात पक्ष संघटन वाढविणार आहे . निवडीबद्दल त्यांना फोन वरून आ.गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच नवनिर्वाचित विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर , ज्येष्ठ नेते देविदास अण्णा कोपनर, शांतीलाल नाना कोपनर, जयसिंग देवकाते, बी . बी.काळे , नाथा काळे, विट्ठल पिंगळे, महेंद्र झीटे यांनीही त्यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .