घारगाव, तालुका. श्रीगोंदा येथील श्री दत्तकृपा शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय(बी.एड) कॉलेजचा निकाल ९६ % टक्के लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली असून कु.कीर्ती खामकर 75.10% प्रथम , कु.अनुराधा बनकर 75.05%द्वितीय, कु. स्नेहल गावडे 75% तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाल्या. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे,सचिव अर्चनाताई पानसरे, रजिस्टर कल्याण शिंदे, प्राचार्य डॉ. गोंटे एम.आर, विभाग प्रमुख प्रा. पवार.एस.एस.शिंदे आर एम, प्रा.शेलार एस.बी,जाधव सर ,शिंदे सर, कोळेकर सर यांनी अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.






