कर्जत जामखेड मतदार संघाचे तीस वर्षापासून आमदार बदलले पण प्रश्न तेच राहिले आता मनसे हाच खरा पर्याय : तालुकाध्यक्ष सचिन सटाले

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील दोन आमदार असल्यामुळे तालुक्याची मोठी भरभराट होईल विकास काम होतील या आशावरती तालुक्यातील जनता तरुण बेरोजगार कार्यकर्ते अवलंबून आहेत.

तालुक्यातील तरुणांना रोजगार देणारा एमआयडीसी सारखा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या महत्त्वकांक्षा पोटी श्रेय वादामुळे प्रलंबित असल्यामुळे अनेक तरुण रोजगारापासून वंचित राहिलेले दिसत आहेत मोठ्या प्रमाणात तरुण उच्चशिक्षित डिग्री घेऊन बेरोजगार हाताला काम नसल्यामुळे हताश होऊन आणि तोरणांचे वय झालेले असून सुद्धा नोकरी नसल्याने लग्न होत नाही.

तसेच या भागातील सीना धरणाची दीड मीटर उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पडू नाही अतिशय कमी खर्चात दीड मीटर उंची वाढल्यामुळे दीड टीएमसी पाणी अतिरिक्त साठा वाढणार असून यासाठी जमीन अधिकरण करण्याची गरज नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल 20 ते 25 किलोमीटर कालव्याची लांबी सुद्धा वाढवण्यात येईल मिरजगाव मध्ये ट्रॉमा सेंटर असूनही अद्यापही काम चालू करण्यात आले नाही मिरजगाव वरून नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग झाला आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका चालू आहे वेळेवर उपचार न मिळालेले रुग्णांना मृत्यूला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे मिरजगाव येथे मंजूर असलेल्या ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर चालू करण्यात यावी तालुक्यातील अनेक वर्ष प्रलंबित असलेला एसटी डेपो सुद्धा अद्यापही झालेला नसल्यामुळे तालुक्यातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना प्रवाशांना मोठी कुचंबा न होत आहे एसटी डेपोवरून अनेकदा राजकारण केले आहे तरी प्रश्न सुटला नाही तसेच या परिसरात 34 गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी सरकार बहुतेकांशी प्रकल्प कामे बंद आहेत तूकाईचारी सारखा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण झाला तर 34 गावांना वरदान ठरणार असून या भागातील शेतीचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी भेटेल व दुष्काळी भागात सुजलाम सुफलाम होईल या परिसरात मध्ये तालुक्यातील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे अजून काही कामे बंद आहेत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही दोन लोकप्रतिनिधी असल्यामुळे या पद्धतीने तालुक्यांतील अनेक प्रलंबित प्रश्न कामे होत नसल्यामुळे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुका ही मोठे आंदोलन उभा करणार आहे दोन्ही आमदारांचा तालुक्यातील जनतेला अनुभव आलेला आहे हे फक्त श्रेयवाद आणि स्वतःचं नाव मोठं करण्यात गुंतलेले आहेस असून या पुढील काळात जनता ही मनसेच्या पाठीमागे पूर्ण ताकतीने उभे राहून या मतदारसंघांमध्ये मनसेचाच आमदार होईल अशे ठाम मत कर्जत तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांनी व्यक्त केली. पक्षाने उमेदवारी दिल्यास मोठ्या ताकतीने कर्जत जामखेड विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलं.