लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार होणार 
असून २०१९ पेक्षा यावर्षी ते मोठे मत्ताधिक्य घेतील असा निर्वाळा हनुमंत भोसले यांनी केला. यावेळी ते बोलताना म्हणाले , काँग्रेसने पत्रकार परिषद घेवून केलेला मतदार संघावरील दावा हा निराधार असून आ.रोहित दादा पवार यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे हीच विजयाची नांदी ठरणार आहेत. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. आ.रोहित पवार हेच विधान सभेचे उमेदवार असून ते मोठ्या मताधिक्यांनी यावेळी निवडून येतील , यात कोणतीही शंका नसेल असे मत हनुमंत भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
आ.रोहीत पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.
गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यांनी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघाची निवड करत तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केला.त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न निकाली काढले. महविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांनी संघर्षाची भूमिका घेत ईडी व इतर दबावतंत्रापुढे न झुकता लढाऊ वृत्ती जपत स्वाभिमानी बाणा जपला .पक्ष फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता जाणता राजा खा .शरदचंद्र पवार साहेब यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय , कोरोना काळात रुग्णांसाठी केलेले उल्लेखनीय कार्य , शासकीय कार्यालये यांनी बदललेला चेहरामोहरा , १९००० विद्यार्थ्यांना सायकल वाटप केल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आली. शेतकरी सहल , पीक परिसंवाद , मिरजगाव येथे गोडाऊन , पिक विमा, वेळेवर कुकडी , सिना आवर्तन यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले . स्मार्ट योजनेअंतर्गत १३ शेतकरी कंपन्यांना ५० कोटी अनुदान, शेतकऱ्यांना दळणवळण करण्यासाठी रस्ते , धार्मिक कार्यक्रमासाठी साहित्य वाटप ,
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार , निर्धुर चूल वाटप , दादा पाटील महाविद्यालयासाठी ९ कोटींचे सभागृह , दादा पाटील महाविद्यालय राष्ट्रीय लेव्हलचे कुस्ती स्पर्धा देशातील २००० मुलींचा सहभाग, मुलींसाठी तेजस्विनी बस यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या व इतर अनेक विकास असा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे युवा व्यक्तिमत्व आ.रोहित पवार हेच २०२४ चे कर्जत जामखेड चे विधानसभेचे आमदार असतील
राज्यात महाविकास आघाडी चे सरकार येणार असून कर्जत एमआयडीसी जानेवारी मध्येच होणार असून येथील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे आणि येथील युवकांना आ .रोहीतदादांबद्दल प्रंचड विश्वास आहे अशी प्रतिक्रिया यावेळी हनुमंत भोसले यांनी दिली.






