
धालवडी येथे ५ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात ११ ते १२ गाठ भजन , सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ , सायंकाळी ,७ ते ८:३० महाप्रसाद , रात्री ८ ते १०:३० हरिकीर्तन व नंतर जागर पार पडणार आहे.सोमवार ५ ऑगस्ट रोजी ह. भ. प.तुकाराम महाराज ढवळे यांचे हरिकिर्तन महादेव पवार यांच्या सौजन्याने पार पडणार आहे. मंगळवार ६ ऑगस्ट रोजी ह. भ. प.हनुमंत महाराज मारकड यांचे हरीकीर्तन पार पडणार आहे.बुधवार ७ ऑगस्ट रोजी ह.भ.प.विकास महाराज देवडे यांचे हरिकिर्तान पार पडणार आहे.गुरुवार ८ ऑगस्ट रोजी ह. भ. प. माऊली महाराज कोठुळे यांचे हरीकिर्तन पार पडणार आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी ह. भ. प.प्रकाश महाराज जंजिरे यांचे हारिकिर्तन पार पडणार आहे.शनिवार १० ऑगस्ट रोजी ह. भ. प.बालाजी महाराज मोहिते यांचे हरिकीर्तन पार पडणार आहे.रविवार ११ ऑगस्ट रोजी ह. भ. प. माऊली महाराज सुडके यांचे हरिकीर्तन पार पडणार आहे.सोमवार १२ ऑगस्ट रोजी ह . भ. प.गणेश महाराज बारंगे यांचे हरीकीर्तन सकाळी १० ते १२ यावेळेत पार पडणार आहे.व्यासपीठ चालक नानासाहेब सूर्यवंशी व व्यासपीठ चालक अंबादास खोडवे असणार आहेत.






