
पिंपळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी आप्पासाहेब दगडु जंजीरे यांची तर व्हा. चेअरमन पदी गणेश आप्पा जंजीरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटी संचालक भागवत किसन जंजीरे, काकासाहेब कल्याणराव जंजीरे, बाळासाहेब नाथा जंजीरे , शेखर दिलीप काळे,सुधीर बापूराव जंजीरे, रायचंद पदा सुळ , बाळासो भाऊसाहेब पोटरे ,नवनाथ ज्ञानदेव माळवदे , कुसुम बबन देवकाते , रंजना देविदास पोटरे , सचिव राजेंद्र बाळासाहेब पोटरे , क्लार्क विशाल लाला जंजीरे व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनियुक्त चेअरमन आप्पासाहेब जंजीरे म्हणाले , शेतकरी हा केंद्र बिंदू मानून येणाऱ्या काळात काम करणार असून शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज पुरवठा, विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहोत.नवनियुक्त चेअरमन, व्हा.चेअरमन यांचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे साहेब, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील, मंगेश बाळासाहेब जगताप पाटील, राजेंद्र बापूसाहेब गुंड, शांतीलाल नाना कोपनर, सुनील गावडे,समीर पाटील, शेखर खरमरे, सुनील काका यादव, बंडाभाऊ मोढळे , पै.भाऊसाहेब सुपेकर, आण्णा खोडवे, पिंटू पाटील , शिवाजी नारायण चोरमले, दीपक बापूराव जंजीरे यांनी अभिनंदन केले. उपस्थितांचे गणेश चंद्रभान जंजीरे यांनी आभार मानले .







