धनराज कोपनर यांच्या वाढदिवसानिमित्त राक्षसवाडी खुर्द शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण 

Google search engine

 

राक्षसवाडी खुर्द येथील उद्योजक तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती धनराज भाऊ कोपनर यांच्या वाढदिवसानिमित्त राक्षसवाडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला . उद्योजक धनराज कोपनर यांच्या वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम हाती घेत शालेय साहित्य वाटप , वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दादासाहेब कारंडे , भानुदास कोपनर, सागर मदने, धोंडीबा कोपनर, अनिल देवकाते , प्रमोद पावणे,अशोक कोपनर पाटील ,  खंडू सर्जेराव रुपनर , नाना पाटील , निलेश कोपनर ,भाऊसाहेब पिंगळे,विजय कोपनर, राजू काळे , खंडू पिंगळे ,बाजीराव कोपनर, नवनाथ पिंगळे , विजय पावणे , बाळासाहेब जानकु काळे, रावसाहेब काळे, खंडू जानकु रुपनर, गुगा कोपनर , अमोल कोपनर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे नियोजन सागर मदने यांनी केले होते.