“कोंढापुरी येथे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर”

0
109
Google search engine

शिरूर, १८ डिसेंबर २०२५ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विशेष हिवाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक २० ते २६ डिसेंबर २०२५ दरम्यान कोंढापुरी तालुका शिरूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये भाषणसत्र, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रमदान यांचा समावेश आहे. शिबिराचे उद्घाटन शनिवार २० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रसिद्ध उद्योजक मा. प्रकाशजी धारीवाल ( अध्यक्ष महाविद्यालय नियामक मंडळ) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती मा. अनिल बोरा ( अध्यक्ष शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ) , मा. नंदकुमार निकम ( सचिव – शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ) , प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते व डॉ. गणेश भामे( संचालक – राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांच्या उपस्थित होणार आहे तर समारोप २६ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता मान. धरमचंदजी फुलफगर ( सदस्य – महाविद्यालय नियामक मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, राष्ट्रीय एकात्मता, सेवाभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हा आहे. शिबिरात विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष हिवाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विशेष व्याख्यानसत्रे आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी व इतिहास लेखन , आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

शिबिरादरम्यान पाणी व्यवस्थापन यावर डॉ. सतीश खाडे, अपारंपारिक ऊर्जा व शाश्वत विकास यावर डॉ. काकासाहेब मोहिते, नव्या पिढीचे उद्योजक यावर मा. सिद्धेश्वर साकोरे, भारतीय लोकसंख्या यावर प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, ग्राहकाची सजगता यावर श्री. धनंजय गायकवाड आणि अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञाननिष्ठ विचार यावर डॉ. सतीश पाटील,पर्यावरण संवर्धन, ग्राहक जनजागृती, मतदान जनजागृती तसेच युवकांचे उद्योजकत्व या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे, श्रमदान, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराच्या कालावधीत काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमधून सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला जाणार आहे.

या शिबिरासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते व उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. रेणुका गायकवाड – करपे, डॉ. अशोक काकडे व प्रा. ओंकार धिंदले आणि सर्व समिती सदस्य कार्य करत आहेत.

शिबिराबद्दल अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर ९७६७७५५६३९ /९५६१९४५४५२ वर संपर्क साधावा.