कोकणगाव येथे शिवसेना शाखा क्र. ५२ अंतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक दृढ करण्यासाठी शिवसैनिकांनी उत्साहाने पुढाकार घेतला आहे. “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित मार्ग आत्मसात करून, गावपातळीवर सामाजिक कार्यातून जनसेवा करण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे.
या शाखेच्या संघटन कार्यात जिल्हा प्रमुख मा.श्री. बाबुशेठ टायरवाले, मार्गदर्शक मा.श्री. अभिषेकराजे भोसले तसेच तालुका प्रमुख मा.श्री. नितीन ईश्वर तोरडमल यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गावपातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांचा सहभाग वाढविणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि ग्रामविकासासाठी शिवसेनेच्या तत्त्वांचा प्रसार करणे याबाबत विस्तृत चर्चा झाली.
पंचायत समिती निवडणूक हरी बाबर हे लढवणार असे जिल्हा प्रमुख यांनी जाहीर केले. या बैठकीत शिवसेना शाखा प्रमुख म्हणून मा.श्री. धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी,मा.श्री.युवासेना शाखा प्रमुख म्हणून मा.श्री.सुजित अशोक घोगरे, शिवसेना उपशाखा प्रमुख म्हणून मा.श्री.विलास भैरू बोरुडे आणि युवासेना उपशाखा प्रमुख म्हणून मा.श्री. ओंकार अरुण बोरुडे यांची निवड करण्यात आली.
तसेच संघटनेच्या कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या शिवसैनिकांमध्ये मा.श्री.दादा घोगरे, मा.श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, मा.श्री.प्रकाश भाऊसाहेब सूर्यवंशी, मा.श्री.संकेत सुरेश बोरुडे, मा.श्री.बाळासाहेब निभोरे मा.श्री.हरिभाऊ बाबर ,डॉ योगेश बोरुडे डॉ.संतोष बोरुडे, मा.श्री.सुभाष धस, मा.श्री.भास्कर शिंदे , मा.श्री.नितीन विनायक बोरुडे, मा.श्री.गिरीश भास्कर चव्हाण, मा.श्री.विकास चंद्रकांत चव्हाण, मा.श्री.संदीप सूर्यवंशी, मा.श्री.अनिकेत बोरुडे, मा.श्री.विजय बोरुडे आदि शिवसैनिक व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.
कोकणगाव शाखेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक सामाजिक कार्य, ग्रामविकास, तसेच जनसंपर्क उपक्रमांतून “शिवसेना — संघटन सर्व परी” हा मंत्र गावागावात पोहोचवण्याच्या निर्धाराने कार्यरत आहेत.
सौजन्य : सर्व शिवसैनिक व पदाधिकारी, शिवसेना शाखा क्र. ५२, कोकणगाव.







