श्री गोदडबा ग्रामीण विकास प्रतिष्ठान च्या वतीने न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल ,कर्जत मध्ये माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

Google search engine

 

 

न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यालयातील माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा वैदकीय अभ्यासक्रमासाठी असलेली नीट पात्र व वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यामध्ये कुमार प्रथमेश लक्ष्मण मुळीक याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे एम . बी. बी. एस.साठी निवड झाली.तसेच कुमारी अक्षता किरण नाईक हिची वैद्यकीय महाविद्यालय प्रवरा लोणी येथे बी.ए.एम.एस.साठी निवड झाली.त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी विद्यालयाचे मा.प्राचार्य श्री. शिवाजी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभास विद्यालयाचे समन्वयक श्री.किरण नाईक सर , पर्यवेक्षक श्री. काळे सर, श्री.मुळीक सर ,सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे स्वागत व सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री.पाटील सर, पर्यवेक्षक श्री.काळे सर ,समन्वयक श्री .नाईक सर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.मुळीक सर यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्याने अभ्यासाची आचारसंहिता बाळगली की यश संपादन करता येते. यामुळे विद्यालय व पालकांचे नाव उज्वल होते असे सांगितले.पर्यवेक्षक श्री.काळे सर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या आयोजनाची भूमिका सांगितली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे सांगितले. तसेच पाटील सर, श्री नाईक सर यांनी सत्कार समारंभ आयोजनातून गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक झाल्याने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल असे सांगितले.या समारंभातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नेत्रदीपक कामगिरी करावी असे सांगितले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .सूर्यवंशी डी.डी यांनी केले व आभारप्रदर्शन श्रीमती रणशिंग मॅडम यांनी केले…