कोटा मेंटॉर्स विद्यालयाचा 100 टक्के निकाल 

Google search engine

कोटा मेंटॉर्स विद्यालय, कर्जत यांचा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. (माध्यमिक शालांत परीक्षा) च्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून निकाल देणाऱ्या या विद्यालयाने यंदाही गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले आहे.

या परीक्षेत सुपेकर वैष्णवी नानासाहेब हिने ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्वल यशाने संपूर्ण विद्यालयाचा गौरव झाला आहे.

 

माने दुर्वा राजाराम हिने ९४.४० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला असून, पठाडे पुष्कराज महेश याने ९४.२० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. 85 टक्के पेक्षा जास्त मार्क घेणारे एकूण 37 विद्यार्थी आहेत परीक्षेत एकूण 61 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते

संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक, शिक्षकांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशात पालकांचे, शिक्षकांचे व संस्थेच्या मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे, असे मुख्याध्यापकांनी नमूद केले.