
कर्जत तालुक्यातील खांडवी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी काल निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच छाया माणिक पठारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते, उपसरपंच पदासाठी सरपंच प्रविण तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी उपसरपंच पदासाठी संजय रामचंद्र कांबळे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे छाननी नंतर अर्ज वैध झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर संजय कांबळे यांचा उपस्थित सरपंच , सदस्य ग्रामस्थ यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब तापकीर , रुपाली उल्हारे, छाया पठारे, वैशाली तापकीर, उषा रणपिसे, संजय कांबळे व सरपंच प्रविण तापकीर उपस्थित होते .
यावेळी बोलताना नवनियुक्त उपसरपंच संजय कांबळे म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत.
यावेळी पोपट कांबळे, प्रदीप तापकीर, विलास कांबळे, प्रकाश पठारे, अभिजित तापकीर, राजेंद्र तापकीर, वसंत तापकीर, रामदास तापकीर,संदीप माकुडे , नवनाथ तापकीर, शहाजी पठारे, नानासाहेब तापकीर, बबन कांबळे, संतोष तापकीर, सुनील खंडागळे, बाजीराव पवार, दादा उल्हारे , महादेव तापकीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल संजय कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.






