
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत दादा पाटील महाविद्यालयाने यशाची परंपरा राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. दिक्षा नानासाहेब जाधव (८९.६७%), साक्षी आजीनाथ मोहळकर (८६%), श्रावणी तानाजी निंबाळकर (८५.६७ %) या विद्यार्थिनींनी विज्ञान शाखेत गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल ९९.०८ टक्के लागला असून त्यातील तीन प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असे आरती विजय शिंदे (८६.३३%), सानिका रामभाऊ बोबलट (७९.१७%), ऋतिका शिवलाल नेटके (७७.८३%) तसेच कला शाखेचा निकाल ७५.७८ टक्के लागला असून त्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी करण संजय काळे (८४%), ऋतुजा सतीशसिंग परदेशी (८२.६७ %), सुहानी अनुरथ साळवे (८१.६७%) हे ठरले आहेत. किमान कौशल्य अभ्यासक्रम निकाल ८१.८१ टक्के लागला असून त्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी दिग्विजय रमेश जगताप (६०%), निखिल नाना भवर (५८.८३%), निकिता संतोष कवडे (५७.१७%) हे ठरले आहेत.
यावर्षीच्या परीक्षा सीसीटीव्ही कॅमेराच्या दक्षतेत घेण्यात आल्या. कॉपीमुक्त परीक्षा याबाबतीत महाविद्यालयाने चोख धोरण राबविले. ब्रिज कोर्स, क्रॅश कोर्स व वर्षभर जादा तासिका, उन्हाळी वर्ग, विद्यार्थ्यांचे तज्ञांद्वारे केले गेलेले समुपदेशन आदि उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले असून, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न स्वीकारता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची दादा पाटील महाविद्यालयाची परंपरा व मिळालेले हे उत्तुंग यश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार व अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्रकाका निंबाळकर, बप्पाजी धांडे तसेच माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, कनिष्ठ विभागाचे कला शाखाप्रमुख प्रा. भिमराव गवारे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. वसंत आरडे, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. जयदीप खेतमाळीस, किमान कौशल्य विभागाचे शाखाप्रमुख प्रा. राजेश दळवी तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, वरिष्ठ विभागातील सर्व उपप्राचार्य सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.







