न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलची  शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी गरुड झेप

Google search engine

 

कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल, कर्जत या शाळेच्या इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी 2024-25 या वर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दरवर्षी घेण्यात येत असलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी करिता आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी करिता घेतलेल्या परीक्षेत न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेच्या विदयार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवून यावर्षीही इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी च्या एकूण 18 विदयार्थ्यांनी या ही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस असे यश संपादन करून शाळेची तालुक्यात असलेली यशाची परंपरा कायम ठेऊन याही वर्षी शाळेला तालुक्यात यशाचा मान मिळवून दिला त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संभाजी लांगोरे साहेब ,समन्वयक किरणजी नाईक सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेचे प्राचार्य शिवाजी पाटील सर, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे सर यांचे हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे ही यावेळी अभिनंदन करून सर्व यशस्वी विदयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.