शिक्षण माणसाला सर्वात्तम स्वातंत्र्य बहाल करते : डॉ.अमोल खेडकर साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, घारगाव येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न

Google search engine

 

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचे धाडस प्राप्त होते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेतील नवनवीन संकल्पना आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करण्यास प्रयत्नरत राहावे, असे प्रतिपादन डॉ . अमोल खेडकर यांनी केले.

ते साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, घारगाव येथील पदवी प्रदान समारंभात बोलताना म्हणाले.तसेच जीवनात सफल होण्यासाठी MJF त्रिसूत्री (मनी, जॉब सॅटिसफॅक्षण व फॅमिली ) यांची सांगड घालावी लागते असेही ते बोलताना यावेळी म्हणाले .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.निंभोरे सर व डॉ.निंबाळकर सर उपस्थित होते. साईकृपा एम.बी.ए.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निंभोरे पदवी प्रदान समारंभाचे अध्यक्ष होते.आपले ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सातत्याने आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर असले पाहिजे, असे डाॅ. सचिन निंभोरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, औषधनिर्माण शास्त्र पदवी घेवून पास झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्युनिअर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. शिक्षण घेण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन असत नाही. तेव्हा गुणवत्तापूर्ण शिक्षणच विद्यार्थ्यांची नवी ओळख निर्माण करते आणि म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेली गुणवत्ता ही महाविद्यालयासाठी महत्त्वाची आहे.

यावेळी बी.फार्मसी च्या अकॅडमीक इन्चार्ज प्राध्यापिका अंकिता गिरमकर यांनी मनोगतात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून आपल्या पदवी शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजासाठी करण्याचे आवाहन केले.

यावेळी विभाग प्रमुख विक्रम पानसरे सर , प्राध्यापिका वीर मॅडम , सांस्कृतिक विभाग प्रमुख वैष्णवी साके मॅडम, नेहा गरूड मॅडम , तृप्ती लगड मॅडम , ऋतुजा लगड मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांना श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम, रजिस्टार श्री कल्याण शिंदे सर, प्राचार्य डॉ. अमोल खेडकर सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.