
पिंपळवाडी येथील कुकडी कालव्याच्या चारीचे पाणी थोटेवाडी व मुसलमान वस्ती येथील बंधाऱ्यात सोडण्याची मागणी बहुजन समाज पार्टीने तालुकाध्यक्ष अल्ताफ भाई शेख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , मौजे थोटेवाडी व मुसलमान वस्ती येथील बंधाऱ्यातील पाणी संपले असून या ठिकाणच्या नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी तसेच वापरासाठी पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न् निर्माण झाला आहे. यामुळे पिंपळवाडी येथील कुकडी कालव्याच्या चारी मधुन थोटेवाडी व मुसलमान वस्ती येथील बंधाऱ्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.







