राक्षसवाडी खुर्द नजीक भीषण अपघातात एक जण जागीच ठार 

Google search engine

 

 

काल 2 मार्च रोजी 08.00 च्या सुमारास राक्षसवाडी खुर्द नजीक एका दुचाकीचा भीषण अपघात झाला.

रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना दुचाकी स्वार रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत दिसला. दुचाकी स्वराच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक मारल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये दुचाकीस्वाराचे नाव रविंद्र बापु औटी असून तो कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथील रहिवासी आहे. मयत रविंद्र बापु औटी यांच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.

रविंद्र औटी यांच्यावर 3 मार्च रोजी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे औटी कुटुंबासह संपूर्ण राक्षसवाडी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.