
टायगर करीयर अकॅडमी मिरजगाव आष्टी यांच्या तर्फे मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या 29 विद्यार्थ्यांची विजयी रॅली उद्या बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता होणार आहे .या विजय रॅली साठी प्रमुख आकर्षण साई रथ व भैरवनाथ 11 डीजे असणार आहे . पोलिस दलात भरती होणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते , हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी टायगर अकॅडमी ,तीन जिल्ह्यांसह मिरजगाव , आष्टी विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरला आहे. अकॅडमी चे संस्थापक हर्षद चौकडे सर यांनी कित्येक गरीब विद्यार्थ्यांचे पोलीस व अन्य सरकारी सेवेत काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हे स्वप्न नुकतेच पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्या विजय रॅली निघणार आहे. मुंबईच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात 43 विद्यार्थी भरती झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत एकूण विद्यार्थी पोलीस , आर्मी , नेव्ही व इतर भरती मध्ये झालेले 1163 आहेत.
या विजय रॅली मूळे नुकतीच नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे .







