डॉ. सुरेश पालवे यांना पीएचडी पदवी प्रदान 

0
229
Google search engine

तालुक्यातील देमनवाडी , अळसुंदे येथील डॉ. सुरेश पालवे यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

वनस्पतीशास्त्र या विषयात त्यांनी “समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटी जंगलाचे हवेतील कार्बन शोषणाच्या प्रक्रिया संबंधी अभ्यास” या विषयी संशोधनपर प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या विषयाचा फायदा खारफुटी वनस्पतीचा वापर हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड कमी करून हवा शुद्ध करण्यासाठी व नामशेष होणाऱ्या खारफुटी वनस्पतीला पुनर्जीवन मिळेल.

त्यांना प्रोफेसर डॉ. अजित तेलवे सर व डॉ. जिंतूरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, विद्यापीठाचे प्र-कुलगुर, डॉ. पराग काळकर, टी. सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ . जगताप सर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भगवान माळी सर तसेच नातेवाईक व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

त्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी त्यांना सीएसआयआर, दिल्ली कडून फेलोशिपदेखील मिळाली.