कुळधरण येथे रंगली स्पर्धा  ५०० महिलांचा उत्साहात सहभाग 

0
306
Google search engine

 

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील त्रिमूर्ती पतसंस्थेतर्फे आयोजित, हळदी-कुंकू कार्यक्रम आणि पैठणीचा खेळ चांगलाचं रंगला .

कुळधरण येथे हळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त आयोजित, पैठणीचा खेळ आणि विविध स्पर्धा प्रसंगी, मंजुषा राजेंद्र गुंड, वंदना महेंद्र गुंड, मीरा सुभाष गुंड, अनुजा अशोकराव गुंड, अश्विनी नंदकुमार गुंड, भारती नवीन गुंड, ॲड .वैष्णवी ओंकार गुंड, सुरेखा चंद्रकांत बारस्कर ,प्रिया युवराज गुंड, जयश्री रावसाहेब सुपेकर ,निर्मला दिलीप सुपेकर, मंदा गुंड आदी महिला उपस्थित होत्या .

यावेळी वरील मान्यवर महिलांनी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व महिलांना तिळगुळ देत ,एकमेकींचा तिरस्कार न करता गोड बोलणे, चांगले वागणे असा संदेश देत प्रत्येक महिलेस भेटवस्तू देण्यात आली . त्याचबरोबर महिलांसाठी महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पैठणी खेळाबरोबरचं, संगीत खुर्ची, तळ्यात- मळ्यात, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा पार पडल्या. उपस्थित सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

प्रत्येक स्पर्धेतून तीन क्रमांकासाठी पैठणी देण्यात आली. तसेच प्रत्येक वार्ड मधून दोन भाग्यवान विजेत्या असे एकूण बारा महिला बारा पैठणींसाठी निवडण्यात आल्या.

पैठणीच्या खेळातील संगीत खुर्ची – स्पर्धेमध्ये विद्या निलेश सुपेकर, आशा महेंद्र सुपेकर, सुप्रिया योगेश सुपेकर या तीन जाऊबाईंनी तिन्ही क्रमांक जिंकून स्पर्धेत धामालचं उडवली.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे -लिंबू चमचा (विजेते)

१) शितल राजू मोरे

२) आशा दादासाहेब गुंड

३) वैशाली संजय सुपेकर

तळ्यात- मळ्यात ,(विजेते)

१)कोमल सुहास सुपेकर

२) अर्चना विनोद आजबे

३) उषा बाबासाहेब जगताप

संगीत खुर्ची (विजेते )

१) आशा महेंद्र सुपेकर

२) विद्या निलेश सुपेकर

३) सुप्रिया योगेश सुपेकर

तर प्रत्येक ग्रामपंचायत वार्ड मधून प्रत्येकी दोन भाग्यवान महिला विजेत्या-रजिया शेख, कमल भोसले ,सुनिता गजरमल, कविता जगताप ,सोनाली गुंड ,मोहिनी सुपेकर, लताबाई गुंड ,शितल जगताप, मनीषा जगताप ,रूपाली बोराडे, ललिता बोराडे, अलका सुपेकर अशा एकूण 21 पैठणी साड्यांचे विजेत्यांना वाटप करण्यात आले.या सर्वांचं मंजुषा गुंड यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रोहिणी यादव यांनी केले तर ॲड .वैष्णवी ओंकार गुंड यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया..,”

 

ग्रामीण भागातील महिलांना, अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून ताण- तणाव निश्चित कमी होण्यास मदत होईल. महिला सक्षमीकरणासाठी हळदी-कुंकू कार्यक्रम व्यासपीठ ठरत आहे. त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र बापूसाहेब गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले जात आहेत”-l

मंजुषा राजेंद्र गुंड  , माजी अध्यक्षा जि. प. अहमदनगर