कर्जत तालुका धवल क्रांतीचे प्रणेते उद्योजक डॉ.शंकरराव नेवसे यांच्या  ५५ व्या अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

Google search engine

 

 

कर्जत मधील प्रसिद्ध उद्योजक सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक माननीय डॉ. शंकरराव नेवसे साहेब यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करून साहेबांना शुभेच्छा दिल्या.

कर्जत येथील शिवसृष्टी या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज मंदिरात अभिषेक करून मनोभावे पूजा करण्यात आली आणि श्री संत गजानन महाराज मंदिर कुळधरण रोड, कर्जत येथे अभिषेक व पूजा करून सद्गुरु मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे पाठक सर, थोरात सर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला.

शिवशंकर पेट्रोलियम कर्जत येथे सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.

त्यानंतर सद्गुरु उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कर्जत येथे प्राचार्य ज्योती अवसारे व सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थित अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

श्री सद्गुरू मल्टीस्टेट बाजार तळ कर्जत येथे संस्थापक थोरात साहेब उबाळे साहेब आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर सद्गुरु मल्टीस्टेट माहिजळगाव येथे राऊत साहेब यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

दुपारच्या सत्रात श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास पतसंस्था मिरजगाव येथे व्यवस्थापक हेंबाडे साहेब आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे माननीय डॉ. शंकरराव नेवसे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी काही विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सद्गुरू कृषी महाविद्यालय बरोबर शिवशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय आणि श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय, मिरजगाव यांचे सर्व विद्यार्थी कर्मचारी प्राध्यापक व प्राचार्य उपस्थित होते या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी ताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, युवा उद्योजक मा. सिद्धांत नेवसे, उद्योग समूहाचे व्यवस्थापक रवी थोरात, बेलगावचे प्रगतशील शेतकरी भगवान शिंदे, सदाबाबू शिंदे काष्टीचे प्रसिद्ध उद्योजक पोपट आबा शिंदे, वाकीचे संदीप कारंजकर आणि सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामदास विटे शिवशंकर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज जाधव, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे, पशुधन व्यवस्थापन विद्यालयाचे प्राचार्य सुहास मेहेत्रे व संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य अनिल चौरे यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी माननीय डॉ. शंकर शेठ नेवसे यांना शुभेच्छा दिल्या.

 

सद्गुरु कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमांमध्ये उपस्थित त्यांनी मा. डॉक्टर शंकर शेठ नेवसे यांचे वाद्याच्या मधुर संगीता मध्ये स्वागत करून त्यांचा सत्कार केला आणि 55 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून 55 दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि केक कापल्यानंतर मा. डॉक्टर शंकर शेठ नवसे साहेबांना आतापर्यंतच्या कार्यासाठी व रयतरत्न पुरस्कार 2020 महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023 महात्मा गांधी सेवा रत्न पुरस्कार 2023 आणि आदर्श शिक्षण महर्षी पुरस्कार 2024 असे विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.

अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना सर्व मान्यवरांनी माननीय डॉ. शंकरराव नेवसे साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या त्यामध्ये संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे सर यांनी आतापर्यंतच्या कार्याची आठवण करून प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले व्यवस्थापक यांनी त्यांचे आर्थिक नियोजन अगदी अचूक व मार्गदर्शक असल्याचे सांगितले. सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी डॉ. नेवसे साहेब यांच्या संघटन कौशल्या बरोबरच प्रत्येक बाबीवर स्वतः लक्ष देऊन योग्य मार्गदर्शक मिळाल्याचे सांगतानाच महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील शेततळे, विहीर,पाईपलाईन आणि सिंचन व्यवस्थेत अमुलाग्र बदल साहेबांमुळेच शक्य झाल्याचे सांगून भविष्यात महाराष्ट्रत उच्च दर्जाचे महाविद्यालय म्हणून सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे नाव झळकेल असे अधोरेखित केले. त्याचबरोबर शिवशंकर कृषी अभियांत्रिकी चे प्राचार्य प्राध्यापक सुरज जाधव यांनी साहेबांमुळे कोट्यावधीचे कामे प्रक्षेत्रावर करू शकलो हे नमूद केले. कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री विनोद शिंदे यांनी सद्गुरु कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर असलेल्या मातृ वृक्ष बाग ही इतर कोणत्याही महाविद्यालयाकडे नाही आणि हे सर्व साहेबांच्यामुळे शक्य झाल्याचे अधोरेखित केले. प्राचार्य शिंगाडे, प्राचार्य चौरे ,प्राध्यापक चांगदेव माने, प्रा. जान्हवी चांदे व प्रा. पूजा इनामके यांनी ही साहेबांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचे उल्लेख केला विविध महाविद्यालयाच्या वतीने मा. डॉ. शंकरशेठ नेवसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला त्यामध्ये मा. सदाबापू शिंदे व मा. भगवान शिंदे, पोपट आबा शिंदे आणि संदीप कारंजकर यांनी साहेबांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सद्गुरु महाविद्यालयाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना डॉ. शंकरशेठ नेवसे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले आणि येणाऱ्या काळात आपल्या उद्योग समूह आणि शैक्षणिक संस्थांमधील सर्व पदाधिकाऱ्यांना उत्तम प्रकारे कार्य करून आपल्या उद्योग समूह आणि शैक्षणिक संस्थेचे नाव उज्वल करण्याचे आव्हान केले. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

महाविद्यालयाने कार्यक्रमानंतर महाविद्यालय प्रक्षेत्रावर प्रा. भगवान सांगळे यांनी केलेल्या नवीन सॅन्ड फिल्टर, फर्टिगेशन आणि स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन मा.डॉ. शंकर शेठ नेवसे साहेबांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर प्रा महेश कुतवळ केलेल्या नवीन सेंद्रिय निविष्ठा व गांडूळ खतांच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आणि शिवालय विद्यार्थी वस्त्रगृहाच्या वतीने मा. डॉ. शंकरराव निवसे साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून त्यांच्या हस्ते वस्तीगृह परिसरात प्रा . डॉ. अभिजित जाधव यांनी केलेल्या नवीन बगीचाचा शुभारंभ वृक्षारोपण करून करण्यात आला.

श्री संत गजानन महाराज दूध संकलन केंद्र, मिरजगाव येथे सुद्धा गणेश मेहत्रे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.

मिरजगावातील प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट श्री गणेश मेहत्रे यांच्या मेहेत्रे अँड असोसिएशनच्या वतीने साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर क्रांती चौक मिरजगाव येथे सौरभ कुराडे आणि मित्र मंडळ यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. धस, अविनाश गोरे यांच्या बरोबर गावातील नागरिक उपस्थित होते.

रात्री उशिरा कर्जत येथे सद्गुरु ऑटोमॅटिक वॉशिंग सेंटर येथे मा. महादेव खंदारे यांनी मा. डॉ. शंकरराव

नेवसे साहेब यांच्या 55 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापून साहेबांना शुभेच्छा दिल्या.

अश्या प्रकारे विविध 15 ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक मा. डॉ. शंकरराव नेवसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला.