

कर्जत शहरातील बाजारतळ येथील सिद्धी ब्युटी पार्लर व लेडीज शॉपी या ठिकाणी पार्लरच्या संचालिका सौ . अश्विनी नामदेव थोरात यांनी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये कर्जत शहरातील अनेक महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी पार्लरच्या वतीने महिलांना वान म्हणून 51 वृक्ष व संसार उपयोगी वान देण्यात आला.
2001 साली शारदा प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यामध्ये सौ अनुराधा खंडागळे थोरात यांनी प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले व त्यानंतर कर्जत या ठिकाणी ब्युटी पार्लरचा अतिशय छोट्या जागेवर व्यवसाय चालू केला ब्युटी पार्लरची क्रेझ हळूहळू कर्जत शहरात वाढत होती त्यानंतर मोठ्या ताईंचे लग्न झाल्या नंतर त्यांनी आपल्या दोन लहान बहिणींना ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले . मनिषा गाडेकर,थोरात सौ राणी देवकर,थोरात या दोघींनी 10.12 वर्ष कर्जत शहरात ब्युटी पार्लर हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट केला या दोघी बहिणी मिळून साधारण 40 ते 50 ही युवतींना ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले व सिद्धी ब्युटी पार्लर चे अधिकृत सर्टिफिकेट त्यांना दिले. त्यांनी देखील स्वतःच्या पायावर उभे राहून कर्जत शहरात ब्युटी पार्लरचा व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी चालू केला . मनीषा व राणी यांचे लग्न झाल्यानंतर सिद्धी ब्युटी पार्लर ची जबाबदारी त्यांनी आपल्या भाऊजई यांना दिली.
सौ, रेणुका संग्राम थोरात व सौ अश्विनी नामदेव थोरात या दोघींनी देखील ब्युटी पार्लरच्या व्यवसायामध्ये अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध केल्या
अश्विनी व रेणुका यांनी देखील सिद्धी ब्युटी पार्लरची नाळ तुटून दिली नाही आपला पारंपारिक व्यवसाय व पंधरा-वीस वर्षांपासून असणारे कस्टमर यांना चांगली ट्रीटमेंट दिली.
कालांतराने व्यवसायामध्ये स्पर्धा आली नवीन फिजिकली मशिनरी आल्या आणि सिद्धी ब्युटी पार्लर ने देखील सर्व मॉडीफाय मशनरी कस्टमर साठी उपलब्ध केल्या हेयर स्पा, फेशियल, हेअर स्मुथनिंग फॅशनल, हेयर कट नवरींचे ब्रायडल मेकअप वॉटरप्रूफ मेकअप या ठिकाणी केले जातात.
अशी माहिती सिद्धी ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ अश्विनी नामदेव थोरात यांनी दिली.हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्षा उषाताई राऊत , माजी जिल्हा परिषद सदस्य मोहिनीताई घुले , उपनगराध्यक्षा रोहिणीताई घुले , माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई भैलूमे नगरसेविका सुवर्णाताई सुपेकर , राणीताई गदादे , हर्षदा काळदाते , सोनालीताई मेहेत्रे
प्रीती जेवरे यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या. आलेल्या सर्व महिलांचे स्वागत सिद्धी ब्युटी पार्लरच्या संचालिका स्वागत सौ अश्विनी नामदेव थोरात व सौ संजीवनी गोविंदराव थोरात यांनी स्वागत केले केले.







