
कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ फार्मसी, पिसोळी, पुणे या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विसावा (माया) वृद्धाश्रम, अंबोडी, सासवड येथे दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी भेट देऊन वृध्दाश्रमास विविध किराणा माल भेट म्हणून दिला. त्यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, फरसाण, तूर डाळ, मुंग डाळ, उडीद डाळ, साखर, चहा पावडर, राजगिरा लाडू, गरम मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धन पावडर, टाटा मीठ, खाण्याच्या तेलाचा १५ लिटर चा डब्बा इत्यादी वस्तूंचा समावेश होता. सदर सामाजिक सेवेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. कल्याण जाधव, खजिनदार मा. विनोद जाधव, कार्यकारी अधिकारी विभावरी जाधव व हर्षदा जाधव यांचे सहकार्य लाभले. भेटीचे आणि विविध किराणा वस्तू भेट म्हणून देण्याचे नियोजन राष्ट्रीय सेवा अधिकारी प्रा. डॉ. रमेश गाडेकर यांनी प्राचार्य डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शना खाली केले.







