कुकडी आवर्तन घारगाव श्रीगोंदा मध्ये दाखल

0
545
Google search engine

 

 

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात आले

मागील आठवड्यात पिंपळगाव जोगे व येडगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाकडे सर्व लाभ क्षेत्रातील आमदारांनी लक्ष वेधले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदा विभागाने परवानगी घेतली आणि कुकडीचे आवर्तन १० डिसेंबरपासून सोडण्याची कार्यवाही केली.

 

१४ जानेवारी २०२५ पर्यंत आवर्तन

कुकडीचे चालू आवर्तन ३५ दिवसांचे असून, १४ जानेवारीअखेर कालव्याला पाणी चालू राहणार आहे. हे पाणी उभ्या पिकांना मागणीनुसार देण्यात येणार आहे. ओढे-नाल्यात पाणी सोडण्यात येणार नाही.