
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कॉलेज फार्मासुटीकल सायन्सेस , लोणी येथे सहाय्यक पदावर कार्यरत असणारे कोल्हार भगवतीपुर येथील प्रा.सागर नानासाहेब खर्डे यांना भगवंत विश्वविद्यालय , अजमेर , राजस्थान पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. फॅब्रीकेशन अँड कॅरॅक्टरायजेशन ऑफ सम ड्रग्स लोडेड बायोनॅनोफायबर्स ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर ड्रग डिलिव्हरी या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता.त्यांना डॉ. के. सर्वानन यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा.सागर खर्डे यांचे फार्मसी क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांनी विविध विषयांवर शोधनिबंध प्रकाशित केले आहे तसेच विविध पुस्तकांचे प्रकाशन केले आहे
पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल प्रा.सागर नानासाहेब खर्डे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .






