
अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स, सीडस् अॅण्ड पेस्टीसाईडस् डिलर्स असोसिएशन, अहिल्यानगर उपाध्यक्ष पदी आदित्य कृषी सेवा, कुळधरण चे. पोपट ( पप्पु शेठ ) सुद्रिक व तसेच राजेंद्र खरात ,विक्रम गदादे , पंढरीनाथ होले यांची संचालक पदी नुकतीच निवड करण्यात आली.
यावेळी दिलेल्या निवड पत्रात त्यांना म्हटले आहे की , संस्थेची कार्यकारीणी सभा विनांक १२ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथे झाली असता सभेच्या संमतीने आणि नुतन अध्यक्ष श्री छबुराव हराळ साहेब यांच्या अधिकाराने सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षांकरिता पोपट( पप्पु शेठ) सुद्रीक यांची संस्थेच्या उपाध्यक्ष या पदावर तसेच राजेंद्र खरात , विक्रम गदादे , पंढरीनाथ होले यांची संचालक पदी निवड झाली.या निवडी मध्ये कर्जत तालुका असो.चे अध्यक्ष विक्रम गदादे यांनी किंगमेकर ची भूमिका बजावली.
यावेळी दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , आज पर्यंत संस्थेच्या वाटचालीमध्ये आणि भरभराटीमध्ये आपला फार मोठा सहभाग आहे यानंतरही आपल्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची आम्हाला वेळोवेळी आवश्यकता लागेल व ते असेच नेहमी मिळत राहील अशी आशा बाळगतो.
निवडीबद्दल उपाध्यक्ष पोपट सुद्रीक व तसेच राजेंद्र खरात, विक्रम गदादे , पंढरीनाथ होले संचालक यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. उपाध्यक्ष निवडीबद्दल पोपट( पप्पू शेठ) सुद्रीक यांनी सर्वाचे आभार मानले.







