आ.प्रा.राम शिंदे साहेबांना अनुक्रमांक २ कमळ या चिन्हापुढीलचे बटण दाबून प्रचंड मतानी विजय करा व विजयाचे शिलेदार व्हा : धनंजय आगम , भाजप युवा मोर्चा , सरचिटणीस आ. प्रा.राम शिंदे

0
273
Google search engine

 

 

आ. प्रा.राम शिंदे साहेबांना अनुक्रमांक. २ नंबर कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतानी विजय करा व विजयाचे शिलेदार व्हा असे आवाहन धनंजय आगम , भाजप युवा मोर्चा , सरचिटणीस यांनी केले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले , आ.राम शिंदे साहेबांना कर्जत जामखेड मतदार संघातील स्वाभिमानी जनता भरभरून मतदान देवून विजयी करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूकीचा आज प्रचार संपत असून भूमिपुत्र आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने निर्णायक आघाडी घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे . त्यामुळे सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागे राहून त्यांनी मतदान करून साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले , धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आ.राम शिंदे साहेब सज्ज झाले आहेत.आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला असून होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना साथ देवून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.