
मागील २५ ते ३० वर्ष कर्जत जामखेड मतदार संघ हा भाजपच्या ताब्यात होता त्या वेळेला भाजपचे आमदार व खासदार काय झोपले होते का ? मागील पंचवीस वर्षे त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघ हा लुटून खाल्ला , आता त्यांना जाग आली असा प्रहार अजित शेळके यांनी केला.
कर्जत जामखेड चा विकास करायला आता विकासाच्या गप्पा मारायच्या बंद करा , कर्जत जामखेडचा विकास हा फक्त आणि कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवारच करू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले , आ.रोहीत दादा पवार यांनी गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे केली .त्यांची ही विकासकामे सांगायला २४ तास पुरणार नाहीत एवढी मोठी विकासकामे त्यांनी मतदार संघात केली , त्यांनी केलेल्या विकासकामांची महती ही स्वाभिमानी जनता जाणून असून ती आ.रोहीत दादा पवार यांना मतांच्या आशीर्वादाने त्याची परतफेड करेल .भारतीय जनता पार्टीचे या मतदार संघावर २५ वर्ष सत्ता होती मग त्यांना त्यावेळी विकास का करता आला नाही .त्यावेळी विकासकामे करण्यासाठी त्यांना वेळ नव्हता का , सर्वसामान्य जनता आता हुशार झाली असून ती आ.रोहीत दादा यांना प्रचंड मत्ताधिक्य देवून विजयी करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
थोड्याच दिवसात आ.रोहीत दादा पवार हे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राहिलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ.रोहीत दादा पवार यानांच सर्वसामान्य जनता निवडून देईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आ.रोहीत दादा पवार यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भविष्यात कर्जत जामखेड मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होणार अशी खात्री यावेळी अजित शेळके यांनी दिली. पाच वर्षांत कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून अमुलाग्र बदल झाला आहे. रस्ते वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. मतदारसंघात विकासाच्या बळावर आणि सुरक्षिततेसाठी आ.रोहित दादा पवार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास अजित शेळके यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणीपुरवठा यात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांच्या मुळे मतदारसंघात सुरक्षितता निर्माण झाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी रस्ते, प्रशासकीय इमारती, उपजिल्हा रूग्णालय, बस स्थानक, पोलीस वसाहत या भव्य दिव्य इमारती झालेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता आमदार रोहित पवार यांच्या बरोबर आहे त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या विकास कामामुळे ते महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. मतदारसंघात अनेक नेते रोहित पवार यांना सोडून गेले आहेत पण सर्वसामान्य स्वाभिमानी जनता आजही विकासकामामुळे आ.रोहित दादा पवार यांच्या बरोबर आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी एमआयडीसी आणण्यासाठी खुप प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला यामुळे बेरोजगार तरुणांचा मोठा रोष भाजपा सरकार वर आहे.
मतदारसंघात शांतता व सुरक्षितता निर्माण होण्यासाठी आमदार रोहित पवार आवश्यक आहेत असे सर्व सामान्य जनता, व्यापारी यांचे मत आहे त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळणारच आहे.
आ.रोहित दादा पवार आजही फक्त विकासावरच बोलत आहेत कोणावर टिका टिप्पणी करत नाहीत. कारण विकास कामाचे मोठे व्हिजन त्यांच्याकडे आहे. रोहित पवार हे नामदार होणार आहेत तसेच भविष्यात हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मताधिक्य रोहित पवार यांना मिळणार आहे असे अजित शेळके यांनी सांगितले.
विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी दादांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
मतदारसंघातील विकासासाठी दादांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक,विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे अजित शेळके यांनी म्हटले आ







