
नारायण आबा पाटील यांचे कट्टर समर्थक , युवा कार्यकर्ते अमोल रमेश सुळ यांनी आ.नारायण आबा पाटील यांच्यासाठी वैयक्तीक जनसंपर्क सुरू केला असून त्यांचा मतदारसंघात मोठा मित्र परिवार असून नारायण आबा पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले , करमाळा माढा मतदारसंघात स्वाभिमानी जनता विरुद्ध धनशक्ती अशी लढाईत आ.नारायण आबा पाटील यांचा विजय निश्चित असल्याची खात्री त्यांनी दिली.
सर्वसामान्य गोरगरिब जनतेची मोठी ताकद नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता एकवटली आहे.नारायण आबा पाटील यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेल्या शाश्वत विकासावर प्रेरित होऊन मतदारसंघातील शेकडो युवक व जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी यांनी नारायण आबा पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विविध प्रलोभने या सर्वांना झुगारून गावागावात विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींसाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांसह तरूण वर्गाने विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात एल्गार पकारत नारायण आबा पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
लोकप्रतिनिधी विरोधात मोठी लाट सक्रिय झाली आहे. गावागावातील अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करू लागले आहेत. या सर्व घडामोडी मूळे आ.नारायण आबा पाटील यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी मतदारसंघामध्ये स्थानिक कार्यकर्ते व गोरगरीब सर्वसामान्य जनता नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे. यंदाच्या निवडणुकीत नारायण आबा पाटील यांचे पारडे जड झाले आहे . त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विजयाचा गुलाल उधळनारच अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.







