आमदार रोहित पवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता व इथला मतदारराजा उभा असल्याने दादांचा विजय निश्चित : काकासाहेब सुद्रिक , मा. उपसरपंच कोपर्डी

0
270
Google search engine

आमदार रोहित पवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता व इथला मतदारराजा उभा असल्याने दादांचा विजय निश्चित : काकासाहेब सुद्रिक , मा. उपसरपंच कोपर्डी

 

कर्जत तालुक्यातील नेतेमंडळी एका बाजूला गेले तरी सर्वसामान्य जनता आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे खंबीरपणे पाठीशी असून त्यामुळे आमदार रोहित पवार यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही काकासाहेब सुद्रिक , मा. उपसरपंच कोपर्डी व मा.ग्रा.सदस्य संजय सुद्रीक यांनी दिली.

कोपर्डी मधील मा.उपसरपंच काका सुद्रिक व मा.ग्रा.स.संजय सुद्रिक यांच्यामुळे राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे आणि यावेळेस ही एकनिष्ठपणे आ .रोहित दादा पवार यांच्याबरोबर हे दोन बडे नेते एकनिष्ठ आहेत .

तालुक्यातील नेतेमंडळी सर्व एका बाजूला गेलेले आहेत , गेल्या पंधरा वर्षात हे नेते मंडळींना मी स्वतःच आमदार होईल असे वाटत होते. म्हणून सर्वजण एकत्र उभा राहिले पण यांना एकालाही यश आले नाही ज्यावेळेस देशमुख यांना आमदार करण्याची गरज होती त्यावेळेस या सर्वांनी कुरघोडीचे राजकारण करून देशमुख यांनाही पाडले आणि स्वतःही पडले आणि त्यानंतर कायमस्वरूपी एकमेकांच्या कुरघोड्या करण्यातच यांचे राजकारण चालला आहे येथील जनता सर्व यांच्या कुरघोड्याचे राजकारणाला वैतागली असून आता खरी ताकद दाखवण्याची वेळ जनतेला आली आहे त्यामुळे आमदार रोहित दादा पवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता व इथला मतदार राजा खंबीरपणे उभा असल्याने आ.रोहीत दादांचा विजय निश्चित आहे हे सर्व नेते मंडळी कायमस्वरूपी कुरघोडी राजकारण करत आलेले आहेत यांना दुसरा मोठा झालेला किंवा नवीन चेहरा पुढे आलेला सहन होत नाही. कारण यांना विचारणारे कार्यकर्ते पाहिजेत . नेता तयार होऊ द्यायचा नाही ही इथली भूमिका कायमस्वरूपी इथल्या सर्व नेते मंडळींनी घेतल्यामुळे जनता वैतागली आहे.

आमदार रोहित दादा पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात शास्वत विकास करत रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती,अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.

पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही.

आ.रोहीत दादा पवार हे दूरदृष्टी असणार नेतृत्व व कर्जत जामखेड मतदारसंघाचा विकास करणारे नेतृत्व असून व्हिजन असणारे हे तरुण नेतृत्व आहे उद्याचे भविष्य आमदार रोहित पवार यांच्या मुळे तरुणांचे भविष्य उज्वल होणार आहे .