
गणेशवाडी येथील आ.राम शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक अंकुश ठोंबरे यांनी आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्यासाठी त्यांनी कंबर कसली असून त्यांनी गणातील वेगवेगळ्या भागात आ.राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ ते दररोज सकाळी लवकर उठल्यापासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारात व्यस्त असून गणातील गावे, वाडी,वस्त्या त्यांनी पिंजून काढल्या असून आ.राम शिंदे साहेबांची विकासकामे ते मतदार राजाला पटवून सांगत असून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आ.राम शिंदे साहेब यांची वाटचाल ही केवळ कर्जत जामखेड मतदार संघापुरती मर्यादित नसून राज्याचे ते थोड्याच दिवसात कॅबिनेट मंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आ.प्रा.राम शिंदे साहेब हे सामान्य घरातील व्यक्ती असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असल्याचे ते यावेळी सर्वांना सांगत आहेत. विशेषत: ज्या नागरीकांबरोबर ते थेट कनेक्ट आहेत त्या नागरिकांना वैयक्तिक जनसंपर्क करून आ.राम शिंदे साहेबांनी मंत्री असताना केलेली कामे व गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांची महती पटवून देत आहेत .आमदार राम शिंदे साहेब यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक कामाने तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक , ग्रामस्थ आ.राम शिंदे साहेबांचे कौतुक करताना त्यांना दिसत आहेत. युवांच्या , गोरगरीब लोकांच्या भविष्याचा आणि विकासाचा सखोल दृष्टिकोन असल्यामुळे लोक बाजारात , चावडीवर जागोजागी आ.राम शिंदे साहेब यांच्या बद्दल जागोजागी बोलू लागले आहेत.ही निवडणूक कर्जत जामखेड करांनी हातात घेतल्याने आता फक्त आ . प्रा.राम शिंदे साहेबांचे लीड मोजायचे अशी प्रतिक्रिया अंकुश ठोंबरे यांनी दिली.







