जिथे खावु तिथे जावु अशा कार्यकर्त्यांमुळे परत एकदा आ .राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव होणार : मा.उपसरपंच रामभाऊ जंजीरे आ.रोहीत दादांच्या विकासकामांमूळे सर्वसामान्यांचे जीवन सुखकर झाले : मा.उपसरपंच रामभाऊ जंजीरे

0
192
Google search engine

 

कर्जत जामखेड ची लढाई ही येणाऱ्या काळात अतिशय लक्षवेधी ठरणारी आहे कारण ही लढाई रोहीत पवार विरुद्ध राम शिंदे नसून सर्वसामान्यं जनता विरुद्ध जन प्रतिनिधी अशी आहे .त्यामुळे रोहीत दादा साठी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनीं आपल्या हातात घेतली असुन मोठ्या मतधिक्याने निवडून येतील असा सर्वसामान्यं जनतेचा विश्वास आहे . आज रोहीत दादा हे सर्वसामान्यांना योग्य ते न्याय देण्याचे काम जन हिताच्या कामातून केले आहे त्यामध्ये महिलांना बचत गटामार्फत रोजगार तसेच व्यावसायासाठी कर्जवाटप करून महिला उदयोग व्यावसायात कशा सक्षम होतील यासाठी प्रयत्न केले तसेच शेतकऱ्याच्यां बांधापर्यंत पानंद रस्ते तसेच भुसंपादन तसेच विद्युत संच पुरवठा करून शेतकरी वर्गानां न्याय देण्याचे काम केले . तसेच शालेय साहीत्य तसेच मुलांच्या बौद्धीक क्षमतेत वाढ होण्यासाठी इंटरनॅशनल पॅनल बॉक्स , मुलांच्या आरोग्या हितासाठी आरोह फिल्टर स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले तसेच मुलांचा वेळ वाचून शाळेतील मुलं हे वेळेवर घरी पोहचण्यासाठी व शिक्षणासाठी पायी चालत येणाऱ्या मुलांसाठी सायकली दिल्या . तसेच वृद्ध स्वस्त दरात औषध पुरवठा कसा उपलब्ध होईल यासाठी प्रत्येक ग्रामीण भागात फिरते दवाखाने उपलब्ध करून दिले तसेच स्वस्त दरात शेतकऱ्यांनां बियाणे उपलब्ध करून कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याचे काम रोहीत दादा यांनी केले . तसेच ऐन कडक उन्हाळ्यात प्रत्येक ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागांत टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम असो किंवा करोना सारख संकट काळात सुद्धा वैयक्तीक विचार न करता जनसेवा केली त्यामुळे नेहमी जनतेच्या संपर्कात राहून सर्व सामान्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम दादांनी पक्षपात न करता प्रामाणिक पणे केले . रोहीत दादांनी कर्जत जामखेड साठी मोठ्या प्रमाणात निधी आणून अनेक विकास कामे त्यांच्या काळात मार्गी लागलीत . आज सर्व सामान्य जनतेला सांगायची गरज नाही कारण जनता झालेला बदल उघडया डोळ्यांने पाहत आहे न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास न ठेवता कर्जत जामखेड मध्ये झालेला बदल हा लक्षवेधी आहे .त्यामुळे आज जिथे खाऊ तिथे जाऊ अशा कार्यकर्ता मुळे पुन्हा एकदा विरोधक श्री राम शिंदे मोठ्या फरकाने पराभुत होतील अशी शंका माझ्या मनात आहे .त्यामुळे सर्वसामान्यांच्या अर्शिवादाने पुन्हा रोहीत दादा बहुसंख्य मतांनी निवडून येतील कारण एक म्हण विख्यात आहे दिसत तस नसतं कारण ही निवडणुक सर्वसामान्य जनतेची आहे ग्रामीण भागातील स्वार्थी आणि लोभी जनप्रतिनिधी कार्यकर्ता रोहीत दादा पवार बद्दल सामाजिक विष पेरण्यांचे काम करत आहे .अशा विचारांना बळी न पडता रोहीत दादा पवार हेच सर्वसामान्यांपर्यंत पोहचु शकतात अशी लोकां ची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात रोहीत दादा फिक्स आमदार असतील यात तिळमात्र शंका नाही . त्यामुळे येत्या २० नोव्हेबर रोजी क्र ३ नंबरचे असणारे श्री रोहीत दादा पवार यांना तुतारी वाजवणारा माणुस या चिन्ह दाबुन एक चांगल हुशार,कौशल्य पुर्ण, आणि युवा दमदार नेतृत्व येत्या काळात आपल्या सर्वानां निवडून द्यायच आहे . कारण होणारा विजय सर्वसामांन्य जनतेच्या विचारांचा असेल एक चांगल्या वैचारिक नेतृत्वाचा असेल आणि संस्कारी आणि चांगल्या कतृत्वा चां असेल अशी आशा करतो