
तालुक्यातील कोंभळी येथील मारुती विनायक कुऱ्हाडे यांची भटक्या विमुक्त आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांनी त्यांची उपाध्यक्ष पदी निवड केली.
यावेळी निवडीचे पत्र देताना उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव ,युवा मोर्चा अध्यक्ष निळकंठ शेळके , भाऊसाहेब गांगर्डे व विविध मान्यवर , पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , आ. प्रा.राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपली उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आपण पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी आपण अथक परिश्रम कराल.
यावेळी बोलताना मारुती कुऱ्हाडे म्हणाले , आ. प्रा.राम शिंदे साहेब यांनी केलेली निवड येणाऱ्या काळात सार्थकी ठरवणार असून पक्ष संघटन , बळकटीकरण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असून आ. प्रा.शिंदे साहेब यांच्या विजयासाठी आजपासूनच मी कठोर मेहनत घेणार आहे.निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .







