हनुमंत ( पप्पु ) वाघ यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी  आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

0
1083
Google search engine

 

आमदार रोहीत पवार यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परिटवाडीचे बूथप्रमुख हनुमंत( पप्पु) वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार राम शिंदे , विलास नाना काळे , राशीन शहराध्यक्ष शिवाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला असून हा आ.रोहीत पवार यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का मानला जात आहे.

यावेळी बोलताना हनुमंत वाघ म्हणाले “आम्ही आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले मात्र पक्षामध्ये एकाच माणसाची मनमानी आणि हुकुमशाही कारभार सुरु असून याच पक्षांतर्गंत नाराजीमुळे मी भाजपात प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले तसेच मी स्वतः बूथ प्रमुख असून काम एकाने करायचे व श्रेय दुसऱ्याने लाटायचे अशी पद्धत राष्ट्रवादी पक्षाची आहे . तसेच रोहीत पवार यांचे स्वीय सहाय्यक कोणतीही मदत करत नसून फोन उचलण्यास टाळाटाळ करतात .