आ.रोहीत दादा हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांचा विजय निश्चित : माऊली लाड 

0
191
Google search engine

 

 

कार्यसम्राट आ.रोहित दादा पवार मतदार संघात आल्यापासून तालुक्याची महाराष्ट्र राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आ .रोहित दादा यांनाच निवडून द्या असे आवाहन माऊली लाड यांनी केले आहे . सर्व तालुक्यातील कार्यकर्ते आ .रोहीत दादांच्या विजयासाठी कठोर मेहनत घेत असून साधी राहणी,उच्च विचार सरणी असणारे नेतृत्व म्हणजे आ.रोहित दादा पवार हे आहेत .

आ.रोहित दादा पवार यांनी विकास कामांच्या आणि लोकांचा प्रत्यक्ष जनसंपर्क या जोरावर कार्यतत्पर आमदार रोहितदादा पवार मोठ्या मत्ताधीक्यांनी निवडून येतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार रोहितदादा पवार यांच्या विकासात्मत दूरदृष्टी त्यांना भावते. मतदार संघात आता पर्यंत कोट्यवधींचा कामे आ.रोहितदादा पवार यांनी केलेली आहेत . लोकांत जाऊन काम करणारा आमदार म्हणून आ.रोहितदादा पवार यांची ओळख आहे तेच खरे भूमिपुत्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले . आ.रोहित दादा पवार यांचा मोठा जनसंपर्क असून मोफत पाणी वाटप , आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी,उद्योग या क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .