भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजूने आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित : किरण साबळे

Google search engine

 

 

कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांच्या विजयात हातभार लावण्यासाठी कोळवडी मधून सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे प्रतिक्रिया किरण साबळे यांनी दिली . तसेच भारतीय जनता पार्टी , कर्जत चे पदाधिकारी. आ .शिंदे साहेबांसाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे.

आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे विकासकामांच्या आधारे बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही त्यांनी  दिली.आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी  जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना विठ्ठल रुक्मिणी सभामंडप ,अंगणवाडी , डांबरीकरण , अंतर्गत रस्ते , पीक विमा , बंधारे , जिम , हायमॅक्स लाईट , पेव्हर ब्लॉक , मंदिर सभामंडप आदी ५ कोटीपेक्षा जास्त रुपयांची विकासकामे दिली.तसेच लाडकी बहीण योजनेमुळे माता भगिनिंना मोठा आधार मिळाला.   फोन करताच कामे झालेच अशी ख्याती असणारे प्रा .आमदार राम शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतदार राजाने आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नावसमोरील कमळ या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.