
भूमिपुत्र करण भाऊ चव्हाण यांना तालुक्यातील सर्वच प्रश्नांची जाण असल्याने त्यांना समर्थन मिळत असून तालुक्यातील सर्वच प्रश्नांवर व्हिजन ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
रस्ते , पाणी , शिक्षण , आरोग्य , वीज, कुकडी , सिना नियमित आवर्तन , युवकांना रोजगारासाठी एमआयडीसी , मूलभूत प्रश्न आदी प्रश्नांवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते यावेळी बोलताना म्हणाले की , कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.त्यामुळे कुकडी, सिना नियमित आवर्तन हे शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग आहे.त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे.जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला जाईल .शाश्वत विकास हा महत्वाचा असून त्यासाठी करण भाऊ चव्हाण हेच सक्षम पर्याय आहेत.







