आ.रोहित दादा पवार विकास कामांच्या बळावर विजयी होतील : शंकर जेवे

आमदार रोहित दादा पवार यांनी शिक्षण , आरोग्य , नागरी सुविधा आदी क्षेत्रात केलेली कामे यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या कामावर समाधानी असून आता इतर पक्षांतील कार्यकर्ते हे देखील त्यांच्या कामाने प्रेरित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत . पाच वर्षांत लोकांना विकासकामे कळलेली आहेत. त्यावर सामान्य जनता फिदा आहे. त्यांची सामान्य लोकाप्रती जुळून घेण्याची वृत्ती त्यांच्या मदत करण्याच्या पद्धती ह्या अनेकांनी अनुभवल्या आहेत.
कोट्यवधींच्या विकासकामांमूळे आ.रोहित दादांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया शंकर जेवे यांनी व्यक्त केली. गेल्या २५ वर्षात भाजपच्या ताब्यात असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांनी गेल्या ५ वर्षापूर्वी भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आणि वर्षानुवर्षाचा विकासाचा अणुशेष भरून काढत मतदारसंघात विकासाची भरारी घेतली आणि याच बळावर आता रोहित पवार यांचा विजय केवळ औपचारिकता असल्याचं दिसत आहे.
आमदार रोहित पवार यांनी मागच्या वेळेस कर्जत जामखेडमध्ये पिण्याची समस्या असताना स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. निवडून दिल्यानंतर आ.रोहित दादा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने एका कॅबिनेट मंत्र्याला तब्बल ४३ हजार मतांनी धूळ चारली आणि कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. या दणदणीत विजयानंतर त्यांचा विकासरथ एवढा जोरात धावू लागला की गेल्या ५ वर्षात त्यांनी केलेली कामे बगीतली तर आजची निवडणूक ही रोहित पवार यांच्यासाठी केवळ औपचारिकता असल्याचे दिसत आहे.
आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. मग मतदारसंघातून जाणारी राष्ट्रीय महामार्ग, गावागावातील रस्ते, पूल बांधले, अद्ययावत शासकीय इमारती, पंचायत समिती कार्यालये, तलाठी कार्यालये, सर्व सुविधायुक्त तीन उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, SRPF केंद्र, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्याची उत्तम सोय केली.
आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांचा अडकलेला पीकविमा मंजूर करून आणला. मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी कसे आणता येईल याची काळजी घेतली. कधी नवे एवढा सीएसआर निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. जिल्हा परिषदेच्या तब्बल ४०० शाळा स्वखर्चातून डिजिटल केल्या. ज्या बँका अगोदर महिलांना कर्ज देण्यासाठी नकारघंटा देत होत्या.अशी परिस्थिती एकेकाळी होती. त्याच कर्जत जामखेड मतदारसंघात आता बँकांनी महिला बचत गटांना ३४ कोटी रुपये कर्ज दिले आहे आणि विशेष म्हणजे त्या कर्जाची परत फेड करण्याचे प्रमाण हे ९९ टक्के आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून वेळेत कर्ज भरल्या जात असल्यामुळे त्या बचत गटांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या व्याज सवलतीचाही फायदा होत आहे.
आमदार रोहित दादांचा जोश आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील वातावरण बघितलं तर आमदार रोहित पवार यांचा हा विजय केवळ औपचारिकताच असल्याचं सर्वसामान्य जनतेचे म्हणणे आहे आमदार रोहित पवार यांनी पक्ष संघटन वाढीसाठी राज्यभर दौरे केले. पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांचं नाव सध्या पुढे येत आहे , आणि अशा परिस्थितीत लोकांकडूनच त्यांच्या प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली जात असल्याचं चित्र आता गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.







