प्रा.प्रवीण भिकाजी आढाव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान 

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील प्रा.प्रवीण भिकाजी आढाव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली . ते १९९८ पासून एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय , वरवंड ता.दौंड जिल्हा पुणे येथे सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी स्टडी ऑफ कंडक्टिंग पॉलिमर ट्राजेशन मेटल नॅनो कंपोजिट अँड देअर कॅटालायटीक ॲक्टिव्हिटी टुवॉर्ड्स द सिन्थेसिस ऑफ हीटरोसायक्लिक कंपाऊंड या विषयवार प्रबंध सादर केला होता. त्यांना नौरोसजी वाडिया महाविद्यालय , पुणे चे प्राचार्य डॉ.वसंत चाबुकस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी ६ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून शोध निबंध प्रकाशित केले आहेत. पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे विविध ठिकाणी अभिनंदन होत आहे.