
वास्तविक पाहता कर्जत तालुक्याचे मतदान जामखेड तालुक्यापेक्षा दुप्पट असताना कर्जत तालुका वाऱ्यावर सुटला आहे.कर्जत तालुक्यातील एकाही उमेदवाराला महायुती व महाविकास आघाडीने संधी दिली नसल्याने तालुक्याची निराशा झाली आहे.३५ वर्षांपासून कर्जत तालुक्यातील आमदार झाला नाही.अर्थात हक्काचा आमदार मिळाला नाही.पिसाळ, शेवाळे,गुंड, तापकीर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांनी एकत्र बसून सक्षम पर्याय द्यावा ही आम जनतेची इच्छा आहे.दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्यक्ष लाभार्थी ५-५ टक्के कार्यकर्ते दोन्ही आमदारांबरोबर आहेत.ते प्रत्यक्ष लाभार्थी असल्याने आपापल्या आमदारांचे उदोउदो करताना दिसत आहेत.ते दोन्ही आमदार परस्परांना उपरे म्हणत आहेत परंतू प्रत्यक्षात दोन्ही आमदार कर्जत तालुक्यासाठी उपरे आहेत.अडचणीच्या काळात दोन आमदार असून जनतेला प्रत्यक्ष एकही आमदार उपलब्ध होत नाही.सर्वसामान्य जनतेला तिसऱ्या पर्यायाची आवश्यकता आहे.बप्पाजींचा सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव व संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्तेचे जाळे लक्षात घेता बप्पाजींनी उमेदवारी करून जनतेला तिसरा पर्याय देऊन कर्जत तालुक्याचे नेतृत्व करावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे .







