माजी मंत्री प्रा.राम शिंदे साहेबांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा विकासकामांच्या आधारे आजच त्यांचा विजय निश्चित झाला असल्याची प्रतिक्रिया किशोर देवमुंडे , भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस,जामखेड यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कोकण ओढा बंधारे, रस्ते, ब्लॉक ,मंदिर सभामंडप वस्त्यांना जोडणारे रस्ते आदी विकासकामे दोन्ही तालुक्यात केली .
कधीही कामासाठी फोन केला की काम करणारा आमदार म्हणून कर्जत -जामखेड मतदार संघात त्यांची ओळख आहे. यामुळे त्यांना जामखेड तालुक्यातून मोठे लीड मिळनार

असल्याची माहिती त्यांनी दिली . तसेच सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन किशोर देवमुंडे यांनी केले आहे.







