
कार्यतत्पर भूमिपुत्र माजी मंत्री प्रा.आ. राम शिंदे साहेब हे विक्रमी मतांनी विजयी होणार असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी बेलगाव मधून त्यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याचे माजी सरपंच आशिष शिंदे यांनी ग्वाही दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जलसंधारण मंत्री असताना व गेली अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे बेलगाव मधील बूथ वरून मोठे लीड देणार असल्याची ग्वाही बेलगावचे माजी सरपंच आशिष शिंदे यांनी दिली.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांनी बेलगाव येथे खंडोबा मंदिर ब्लॉक , गावाअंतर्गत सिमेंट रोड ,कोकण ओढा बंधारे, बेलगाव मिरजगाव रोड , भैरवनाथ मंदिर ब्लॉक , खंडोबा मंदिर सभामंडप , खंडोबा मंदिर सभामंडप शिंदे वस्ती , दोन्ही खंडोबा मंदिर सभामंडप आदी विकासकामे दिली.
१ कॉल , प्रॉब्लेम सोल्व अशी ख्याती असणारे प्रा .आमदार शिंदे साहेब हेच विकासपुत्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा राहिलेला विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन बेलगाव चे माजी सरपंच आशिष शिंदे यांनी केले आहे.







