आ.प्रा.राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील : सचिन मेरगळ 

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन सचिन मेरगळ यांनी केले आहे.

यावेळी त्यांनी  चखालेवाडीतून आ.शिंदे साहेब यांना मोठे मत्ताधिक्य देणार असल्याची ग्वाही दिली. चखालेवाडीसाठी अंतर्गत रस्ते , बंधारे , पाणीपुरवठा , राम मंदिरासाठी सभा मंडप , विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी सभा मंडप आदी मोठी विकासकामे केली आहेत. आपल्या मातीच्या विकासासाठी अखंड संघर्ष आणि वचनबद्धता. आपल्या जनतेच्या हक्कांसाठी,कर्जत जामखेडच्या उन्नतीसाठी आता कोणतीही माघार नाही. हे रण पुन्हा उभे राहण्याचे, आपल्या मातीच्या सन्मानाचे असून भूमिपुत्राचा एल्गार , आपला तो आपलाच असतो हे त्यांनी ग्रामविकास करून दाखवून दिले आहे . त्यांना यात जनतेची मोलाची साथ मिळाली आहे.

आ.पवारांनी गंडवागंडवी , लोकांनी मागणी नसलेले उद्योग करून मूळ प्रश्नापासून लोकांचे लक्ष विचलित करणे , बेरोजगारी , खोटं बोल पण रेटून बोल- साहेबांनी मंजूर केलेली अनेक कामे मीच केली आणि नारळ फोडले यात खोटारडे पणा उघड झाला , यांना निवडणूक आली की सर्व दिसते अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की , आमदार प्रा राम शिंदे यांनी मंत्री पदाच्या काळात जलसंधारणचे काम केल्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला . आज कर्जत तालुका शेत उत्पादनात अग्रेसर बनला आहे. म्हणून काम केले. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

 

मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.