
कार्यकुशल आमदार रोहितदादा पवार यांच्या विकास दूरदृष्टी त्यांना भावत असून आ.रोहित दादा पवार यांच्या जनसंपर्कामुळे ते मोठ्या मतांनी विजय संपादन करतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विश्वासू कार्यकर्ते गोरख सौताडे दिली. गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास विरुद्ध विकासाचे मारेकरी ह्या एकाच मुद्यावर होणार आहे आणि यामध्ये आमदार रोहित पवार यांची कित्येक पटीने सरशी होणार हे निश्चित आहे .







